Ajay Maharaj Baraskar अजय महाराज बारस्कर यांचा फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर ठिया पोलिसांनी दिला चोप Big News

सागर बंगल्यासमोर काय घडलं ?

Ajay Maharaj Baraskar अजय अजय मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे वादात अडकलेले, अजय महाराज बारस्कर आज देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी थेट सागर बंगल्यावर गेले होते. सागर बंगल्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जरांगे पाटलांवर थेट आरोप केला होता. याबरोबरच राज्य सरकारवर देखील ताशेरे ओढले. पाटील समाजाची दिशाभूल करत आहे. मी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढत आहे असे देखील वक्तव्य अजय महाराज बारस्कर यांनी केलं. अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूर मध्ये जळून खाक झाली होती. ती कोणी पेटवून दिली की तिचा काही अपघात झाला याचा अजून तपास लागणे बाकी आहे.

आज मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी मध्ये पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केल आहे. म्हणून जरांगे पाटील यांच्यावर टीका करत अजय महाराज बारस्कर यांनी सरकारच्या विरोधात देखील अपशब्द वापरले आहेत. आज मी मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. यानंतर मी थेट सागर बंगल्यावर जात आहे असे देखील बारस्कर यांनी म्हटलं. Ajay Maharaj Baraskar

बारस्कर फडणवीस कनेक्शन

Ajay Maharaj Baraskar अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे बारस्कर हा फडणवीस यांचाच माणूस आहे अशी चर्चा सोशियल माध्यमांवर झाली होती. दरम्यान अजय बारस्कर यांचा फडणवीस यांच्या सोबत चा फोटो देखील व्हायरल झाला होता. वारंवार जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अजय बारस्कर चांगलेच वादात अडकले होते. आज पुन्हा एकदा बारस्कर महाराज यांनी जरांगे पाटलांवर टीका केली आहे.

बारस्कर म्हणाले मी तर पवारांचा कार्यकर्ता

आज पत्रकार परिषदे दरम्यान Ajay Maharaj Baraskar यांनी पत्रकारांशी बोलताना एक खुलासा केला आहे. जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माझा फडणवीस यांच्यासोबत असलेला फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केला. तर मी फडणवीस यांचा कार्यकर्ता नसून मी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. माझे शरद पवार यांच्यासोबत फोटो देखील आहेत. परंतु जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी माझा पवारांसोबत चा फोटो व्हायरल केला नाही. स्वतःच्या मोबाईल मधील तो फोटो देखील अजय बारस्कर यांनी माध्यमांना दाखवला.

लोकसभा निवडणुकीवर बारस्कर यांचे वक्तव्य

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मोठा फटका बसला. मनोज जारंगे पाटील यांच्यामुळे महायुतीचे उमेदवार पडल्याचं अजय महाराज कर यांनी कबूल केलं. परंतु निवडून आलेले खासदार देखील मराठा समाजाच्या बाजूने आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित केला? जालन्याचे कल्याण काळे, बीडचे बजरंग सोनवणे हे फक्त जरांगे फॅक्टर मुळे निवडून आले परंतु हे खासदार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देत नाहीत. संसदेत अमोल कोल्हे यांच्या भाषणावर सोनवणे यांनी टेबल वाजवले तर वडीगोद्री मध्ये हाके यांच्या आंदोलनाला कल्याण काळे यांनी भेट दिली असे आरोप Ajay Maharaj Baraskar यांनी केले.

Ajay Maharaj Baraskar यांना जरांगेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी

आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना अजय बारस्कर Ajay Maharaj Baraskar यांनी मला जरांगे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचं सांगितलं आहे. त्यातील काही कॉल रेकॉर्डिंग देखील मी पोलिसांना देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. पंढरपूर येथे माझी कार जरांगे यांच्याच कार्यकर्त्यांनी पेटून दिल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. उपोषण करून काही होणार नाही, आरक्षणाची लढाई वकिलांची फौज घेऊन लढावी लागेल.

पूजा खेडकर प्रकरणावर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ??

Ajay Maharaj Baraskar Live | बारस्कर महाराज पत्रकार परिषद

मी तज्ञ वकिलांना घेऊन येतो जरांगे यांनी देखील त्यांच्या वकिलांना घेऊन यावे असं बारस्कर म्हणाले. मराठा आरक्षणाची लढाई लढत आहे. स्वतः मी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांना जॉब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तडका फडकी बारस्कर सागर बंगल्याकडे गेले.

Ajay Maharaj Baraskar यांचा दलित मराठा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न

जरांगे आणि त्यांचे कार्यकर्ते फक्त कमजोर लोकांना त्रास देतात, त्यांच्या दम असेल तर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा विरोध करून दाखवावा असं आव्हान देखील Ajay Maharaj Baraskar यांनी केलं. प्रकाश आंबेडकर आणि जरांगे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य नवीन वाद निर्माण करू शकतं असं सध्या सोशल मीडियावर बोलले जात आहे. बारस्कर यांना मराठा आणि दलित यांच्यात वाद लावायला सरकारकडून सुपारी दिली असल्यास मत सोशल मीडियावर लोक व्यक्त करत आहेत.

Ajay Maharaj Baraskar बारस्कर यांना पोलिसांकडून चोप

फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पुरस्कारांना फडणवीस भेटलेच नाहीत. त्यानंतर बारस्कर फडणवीस यांच्या बंगल्यासमोरील फुटपाथ वर ठिय्या मांडून बसले. जरांगे यांनी फक्त सागर बंगल्यावर जाण्याचं बोलून दाखवलं मी करून दाखवला आहे असं वक्तव्य देखील त्यांनी मीडियाशी बोलताना केलं. जोपर्यंत फडणवीस यांची भेट होणार नाही तोपर्यंत मी सागर बंगल्या समोरून उठणार नाही यावर बारस्कर ठाम होते. परंतु मध्येच मुंबई पोलिसांनी त्यांची उचल बांगडी केली आणि थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर असं ठिय्या मांडून बसणं योग्य नाही. अशा प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते म्हणून पोलिसांनी बारस्कर यांना जबरदस्ती उचलून नेले. त्यानंतर बारस्कर आणि रमेश पाटील यांच्यातील एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. बारस्कर तुला पोलिसांनी कसा चोप दिला ? असं वक्तव्य रमेश पाटील करत आहेत. सागर बंगल्यासमोर बसलेल्या बारस्कारांना उचलून नेऊन पोलिसांनी चोप दिला असल्याच्या बातम्या सध्या समाज माध्यमांवर धडकत आहेत. जरांगे पाटील उपोषणाला बसले म्हणून प्रसिद्धी मिळावी म्हणून बारस्कर स्टंट करत असल्याचे देखील बोलले जात आहे

महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsaap Group जॉईन करा