Avinash Sabale struggle अविनाश साबळे वीटभट्टी कामगाराच्या मुलाचा बीड ते पॅरिस ऑलिम्पिक पर्यंतचा संघर्ष

Avinash Sabale

६ ओगस्ट २०२२ च्या दिवशी बर्मिघ मधील धाव पट्टीवर भारत देशाच्या अपेक्षेच ओझं आपल्या खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता. त्यावेळी त्याचे आईवडील मात्र हजारो किलोमीटर दूरवर महाराष्ट्रातील बीड मध्ये एका विटभट्टीवर काम करत होते.

३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुरुवातीला हा तरुण चौथ्या क्रमांकावर होता. परंतु शेवटच्या ५०० च्या कालावधीत या तरुणाने असा काही वेग घेतला आणि सर्व धावपटूनच्या हातातून रौप्य पदक हिसकावला.

अगदी काही मायक्रो सेकंदाच्या फरकाने त्याचे सुवर्ण पदक हुकले. पण त्याने केलेली कामगिरी देशाची मान उंचावणारी होती. त्याने जणू एक नवा इतिहासच रचला होता.

हा तरुण म्हणजे भारताचा ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीमधील धावपटू Avinash Sabale अविनाश साबळे.

Avinash Sabale अविनाश साबळेचा संघर्ष

तब्बल दोन वर्षानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धावण्यासाठी सज्ज झाला. एवढच नाही तर भारतीय धावपटूंच्या यादीत अविनाश वर पदकांची सर्वाधिक अशा आहे. गावाकडच्या शेतातील कच्च्या रस्त्यावरून अविनाशचा हा प्रवास पॅरिसच्या धावपट्टी पर्यंत पोहचला आहे. आज आपण अविनाशच्या संघर्षाबद्दल आढावा घेवूया.

Avinash Sabale चे आई वडील विटभट्टी कामगार आहेत

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या मांडावा या गावात १३ सप्टेंबर १९९४ रोजी अविनाशचा जन्म इक साधारण शेतमजुराच्या कुटुंबात झाला. वैशाली आणि मुकुंद साबळे हे अविनाशचे आईवडील. अविनाशचे आई बाबा शेतमजुरी व वीटभट्टीवर काम करायचे. त्यामुळे अविनाशने अगदी बालपणापासूनच संघर्ष आणि गरिबी अनुभवली होती.

शेतमजुरी आणि विट भट्टीवर काम करणाऱ्या आई वडिलांनी मात्र अविनाशच्या शिक्षणाला महत्व दिले. तीन भावंडामध्ये अविनाश सर्वात थोरला असल्याने अगदी खेळण्याच्या वयातच Avinash Sabale अविनाशने संघर्ष अनुभवला होता.

आपले आईवडील शेतात राब राब राबतात त्यामुळे त्यांच्या कष्टाचे चीज करायचे हे अविनाशचे स्वप्न होते. सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात अविनाशला अपयश आले त्यामुळे त्याने लष्करात भारती होण्याचे ठरवले प्रचंड सराव केला . आणि लष्करामुळेच अविनाश शर्यतीच्या ट्रॅक वरपरत आला.

अविनाश ची शाळा घरापासून ५-६ किलोमीटर दूर होती. अविनाश शाळेत चालत जायचा, शाळेत जाण्यासाठी उशीर होईल् म्हणून तो शाळेत धावत जायचा. रोज घर ते शाळा आणि शाळा ते घर या प्रवासामुळे अविनाशला धावण्याची सवय झाली व धाव्ण्याम्ध्ये त्याला आवड निर्माण झाली.

अविनाशचा धावण्याचा सराव पाहून त्याचे शिक्षक त्याला धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सांगायचे आणि अविनाश जिंकायचा सुद्धा. तेंव्हा शिक्षकांनी अविनाशने क्रीडा क्षेत्रात लक्ष द्याव म्हणून शिक्षकांनी देखील प्रयत्न केले.

Avinash Sabale पहिली स्पर्धा आणि पहिले बक्षीस १०० रुपयाचे

अविनाश शाळेत देखील हुशार होता. शाळेत त्याचा नेहमी प्रथम किंवा दुतीय क्रमांक यायचा. अविनाश हुशार असल्याने शिक्षकांचा देखील अविनाश्वर जीव होता. त्याचा धावण्याचा वेग आणि आवड पाहून शिक्षक त्याला शाळेत धवण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठीप्रोत्सहान देत असत.

जीवनातील पहिल्या शर्यतीबद्दल सांगताना अविनाश म्हणाला कि शाळेत असताना मुटकुळे सर आणि तावरे सर त्याला रेस साठी घेऊन गेले होते. ती स्पर्धा ५०० मीटर धावण्याची होती आणि त्या स्पर्धेसाठी १०० रुपयाचे बक्षीस होते. अविनाशने हि स्पर्धा जिंकून जीवनातील पहिले बक्षीस १०० रुपये मिळवलं होतं .

त्यानंतर धानोरा मॅरेथॉन साठी देखील शिक्षक त्याला घेऊन गेले होते . तिथे देखील सलग दोन वेळा त्याने शर्यत जिंकली होती. परंतु हि स्पर्धा वर्षातून फक्त एकदा असायची. येथूनच अविनाशला स्पर्धेमध्ये भाग घेण्याची आवड निर्माण झाली होती.

लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन अपडेट 1500 ऐवजी 1 रुपया?

आई-वडिलांसोबत मजुरी

दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अविनाश आई वडिलांसोबत मजुरी करू लागला. घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे अविनाशने घरच्या परिस्थितीत आर्थिक हातभार लागावा या हेतूने Avinash Sabale काम करायचा.

अविनाश हुशार होता म्हणून वडिलांनी जमीन विकून त्याला शिकवण्याची तयारी दाखवली मात्र अविनाश तयार झाला नाही. त्यानंतर त्यांनी काकांसोबत गवंडी कामावर जाण्याचा निर्णय घेतला , तेथे त्याला १०० रुपये मजुरी मिळायची.

अविनाशने अत्यंत शान्घार्ष करून मजुरी बरोबर आपले शिक्षण देखील सुरु ठेवले. हाताची बोटे फुटल्याने जेवताना आग आग व्हायची पण अविनाशने सगळ सहन केल.

Avinash Sabale बारावीत असताना सुद्धा अविनाश कॉलेज संपल्यावर काकांसोबत मजुरी करायचा १०० बक्षीस ते १०० रुपये मजुरी हा काही वर्षाचा काळ त्याला बरच काही शिक्वून गेला आणि आजही त्याला या संघर्चाचा फायदा होत आहे.

लष्कराने घडवले जीवन

बारावी उतीर्ण झाल्यानंतर अविनाशने लष्कर भर्तीची तयारी केली आणि त्यात त्याला यश देखील मिळाले. लष्करात भरतीसाठी निवड झाल्यावर अविनाशच्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण खूप खडतर संघर्षातून अविनाश लष्करात भरती झाला होता.

अविनाश भरती झाल्याने जीवनाचे सार्थक झाल्याची भावना सर्व कुटुंबियांच्या मनात होती. पण खर तर ती अविनाश साठी एक वेगळ्या जीवनाची सुरुवात होती.

अविनाशने लष्कराचे प्रशिक्षण पूर्ण करून चार वर्ष वेगवेगळ्या भागात ड्युटी केली. लष्करात असताना पहिल्याच दोन वर्षात अविनाशला खूप खडतर प्रवास करावा लागला. एकीकडे राजस्थान मधील गर्मी तर एकीकडे सियाचीन मधील गोठून टाकणारी थंडीचा त्याला सामना करावा लागला.

त्यानंतर २०१५ च्या लष्कर क्रोस कंट्री धावण्याच्या शर्यतीतून तो पुन्हा एकदा धावण्याच्या स्पर्धेकडे वळला, अवघ्या दोन वर्षात तो पाचव्या क्रमांकावर आला. आता काहीही झाल तरी जिंकायचच त्याने मनाचा निश्चय केला आणि पुन्हा धावण्याची जोरदार तयारी केली.

अविनाशने तयारी करत असताना तब्बल १५ किलो वजन कमी केले आणि सरावात सातत्य ठेवले.

अविनाशची मेहनत पाहून प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपलचेस साठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. आणि त्यांनी त्याला प्रशिक्षण देखील दिल. २०१८ च्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेस या स्पर्धेत ३० वर्ष जुना विक्रम मोडून नवीन राष्ट्रीय विक्रम केला.

या स्पर्धेत अविनाशने १९८१ मधील गोपाल सैनी यांचा विक्रम मोडीत काढून त्यांच्यापेक्षा ०.१२ सेकंदाने कमी वेळेत ३००० मीटर धावण्याचा विक्रम केला. अविनाश ने ८.२९.८८ हा नवीन विक्रम केला.

त्यानंतर अविनाशने तब्बल ९ वेळा नवनवीन राष्ट्रीय विक्रम केले.

पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पदक

अमरीश कुमार यांच्या मदतीने रशियाचे नोकोलाई स्नेसारेव्ह यांनी देखील अविनाशची कामगिरी सुधारण्यासाठी मदत केली. त्यांच्या मदतीच्या आणि मार्गदर्शनाच्या जोरावर अविनाशने २०१९ मधील फेडरेशन कप आणि त्यानंतर आय ए ए एफ़ वल्ड चाम्पियनशिप मध्ये चांगली कामगिरी करत नाव कमवले.

अविनाशने या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदक जिंकून सर्वांची मने जिंकत भविष्यातील यशाची झलक दाखवून दिली.

याच स्पर्धेत अविनाशने स्वतःचाच दोनवेळा विक्रम मोडला आणि त्याची टोकियो ओलम्पिकसाठी देखील निवड झाली. १९५२ नंतर स्टीपलचेस या प्रकारात ओलम्पिक साठीपात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. मात्र या स्पर्धेत त्याला कोव्हीड मुले यश संपादन करता आले नाही. परंतु त्यानंतर अविनाशने दमदार कामगिरी केली.

२०२२ मध्ये झालेल्या बर्मिन्घमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले. अविनाशचे पंतप्रधान नरेन्द्र मोडी यांनी विशेष कौतुक केल.

राष्ट्रकुल स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताला पहिल्यांदा हे पदक मिळाले.

त्यानंतर सिलेसिया डायमंड लीग या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून अविनाशने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवली.

२०२३ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. हि स्पर्धा होंगझाउ येथे झाली होती. या स्पर्धेत अविनाशने ८.१९.२० असा विक्रम्कारात ३० वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.

अविनाशला २०२२ मध्ये अर्जुन पुरस्कार देखील मिळाला. क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा हा दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.

हा होता बीडच्या भूमिपुत्राचा संघर्ष . अविनाशने पॅरिस मधील स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी करून भारत देशाचे नाव उंचावे याच सर्व भारतीयांकडून अविनाशला शुभेच्छा आहेत.

सरकारी योजनांबद्दल नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा