बीड विधानसभा निवडणूक
Beed Vidhansabha Election महाराष्ट्र राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा विशेष चर्चेत राहिला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या वादावरून बीड कडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. आता काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याकडे विशेष लक्ष असणार आहे. बीडमध्ये आष्टी-शिरूर-पाटोदा हा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. कारण या मतदार संघातील राजकीय पुढारी लोकसभा निवडणुकीमध्ये एकाच स्टेजवर पाहायला मिळाले. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांचे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. मतदार संघात देखील विधानसभेचे तिकीट कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा आहे.

सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे तीनही नेते महायुतीमध्ये आहेत. बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत तर सुरेश धस यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भीमराव धोंडे यांनी तिकीट मिळवलं होतं परंतु त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी धोंडे यांचा पराभव केला होता. सध्या हे तीनही नेते महायुतीमध्ये आहेत त्यामुळे आष्टी शिरूर पाटोदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.Beed Vidhansabha Election
पूजा खेडकर प्रकरणावर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ??
लोकसभा निवडणुकीमध्ये या तीनही नेत्यांनी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी तगडी फीडिंग लावली होती. मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा समोर असल्यामुळे या तीनही नेत्यांना हवे तसे यश मिळाले नाही. पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरेश धस यांनी चांगली ताकद लावली होती परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे त्यांचीही लोकसभा निवडणुकीत दम छाक झाली होती. Beed Vidhansabha Election त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी महायुती कोणता फॉर्मुला आखते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मतदारसंघांमध्ये सुरेश धस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर ओबीसी मतदार धोंडे यांना पसंती दर्शवत आहेत. परंतु महायुतीत असलेले पक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणी काम केलं
आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. बीड लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलं होतं. कारण सध्या मराठा आरक्षणावरून विविध आंदोलन सुरू आहेत, बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील देखील याच बीड जिल्ह्यातील आणि विशेष म्हणजे आष्टी शिरूर पाटोदा या मतदारसंघातील आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणामुळे सर्वच नेत्यांची दमछाक झाली होती. पुढाऱ्यांना गावबंदी सारखे प्रकार देखील झाले होते.
मराठा समाजाचा आक्रोश पाहता एकही नेता गावागावात फिरण्याची हिंमत दाखवत नव्हता. परंतु एकमेव सुरेश धस यांनी लोकांचा रोष पत्करून पंकजा मुंडे यांचा प्रचार केला. परंतु त्यांनी केलेला प्रचार देखील लोकांच्या गळी उतरला नाही. बाळासाहेब आजबे यांनी देखील प्रचार केला परंतु त्यांच्या तुलनेत सुरेश धस आघाडीवर होते. सुरेश धस यांनी स्थापन केलेल्या बूथ कमिटी, सरपंचाच्या बैठकी, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क या बळावर त्यांनी ताकद दाखवून दिली परंतु त्यांनाही अपयश आलं. महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या कामावर तिकीट देण्याचे ठरवल्यास सुरेश धस आघाडीवर राहतील असं बोललं जात आहे.
Beed Vidhansabha Election मतदारसंघावर कोणाची पकड आहे
आष्टी शिरूर पाटोदा या मतदारसंघांमध्ये बाळासाहेब आजबे विद्यमान आमदार असले तरी, सुरेश धस यांची मतदारसंघातील खेड्यापाड्यात मोठा जनसंपर्क आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भीमराव धोंडे पाच वर्ष आष्टी सोडता बाकी तालुक्यांमध्ये जास्त फिरले नाहीत. नवनिर्वाचित निवडून आलेले आमदार बाळासाहेब आजबे यांनी तीनही तालुक्यात जम बसवण्याचा प्रयत्न केला, अजितदादा पवार गट सत्तेत आल्यानंतर त्यांनी विविध कामाच्या माध्यमातून आपली जरब बसवली. परंतु आजबे यांच्या तुलनेत सुरेश धस हे मुरब्बी आहेत दांडगा जनसंपर्क आणि तीन वेळा आमदार व मंत्रीपदाचा अनुभव असल्यामुळे त्यांना राजकारणातील खडा न खडा माहित आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असून देखील पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावली होती त्यामुळे भाजपा पक्ष श्रेष्ठी सुरेश धस यांच्याच नावाला पसंती देईल अशी चर्चा आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळे मराठा चेहरा पुढे करण्याचा भाजपाचा प्लॅन असू शकतो. मराठा मतदारा बरोबरच ओबीसी मतावर देखील सुरेश धस यांची पकड आहे. परंतु महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला कसा ठरतोय यावर आष्टी शिरूर पाटोद्याची उमेदवारी ठरणार आहे. तिकीट देण्याचा निर्णय झाला तर बाळासाहेब आजबे यांना तिकीट मिळू शकते. परंतु जर मराठा ओबीसी मताचा विचार केला तर ही जागा भारतीय जनता पार्टीला दिली जाऊ शकते. आणि ओबीसी मतांचा विचार घेतल्यास सुरेश धस यांच्या ऐवजी भीमराव धोंडे यांना तिकीट दिले जाऊ शकते.

Beed Vidhansabha Election मध्ये जरांगे फॅक्टर मुळे दमछाक होणार
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मोठा मतदानावर फटका बसला होता आता विधानसभा निवडणुकीत देखील तेच चित्र पाहायला मिळू शकते. म्हणून जरांगे पाटील पुन्हा उपोषणासाठी बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा मतदार एक वटून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करताना पाहायला मिळाला. 2019 च्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आष्टी-शिरू-रपाटोदा एकट्या मतदारसंघातून 70 हजाराची लीड मिळाली होती. परंतु 2024 च्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला पाहिजे तेवढी लीड मिळाली नाही. आष्टी शिरूर पाटोद्यामध्ये मराठा मुस्लिम आणि दलित मतदान 70 टक्के आहे तर ओबीसी मतदान 30 टक्के आहे.
मुस्लिम आणि दलित मतदान महायुतीच्या पथ्यावर पडत नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे दलित मुस्लिम आणि मराठा मतदार एकवटले तर महायुतीला या मतदारसंघात देखील मोठा फटका बसू शकतो. मनोज जरंगे पाटील देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. आष्टी शिरूर पाटोद्यातील महायुतीच्या एकाही नेत्यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दाखवले नाही. त्यामुळे मराठा समाजाची विशेष नाराजी आहे. महाविकास आघाडी नवीन चेहरा समोर आणून वेगळाच गाव खेळू शकते त्यामुळे महायुतीने कोणताही उमेदवार दिला तरी त्यांच्या विजयाची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. आई निवडणुका तोंडावर असताना महायुतीतील सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी अमच्या Whatsaap ग्रूप मध्ये जॉईन व्हा
Table of Contents
Beed Vidhansabha Election महाराष्ट्र राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा विशेष चर्चेत राहिला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या वादावरून बीड कडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. आता काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याकडे विशेष लक्ष असणार आहे. बीडमध्ये आष्टी-शिरूर-पाटोदा हा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. कारण या मतदार संघातील राजकीय पुढारी लोकसभा निवडणुकीमध्ये एकाच स्टेजवर पाहायला मिळाले. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांचे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. मतदार संघात देखील विधानसभेचे तिकीट कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा आहे.
तुमच्या मते आष्टी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल तुमचे मत कॉमेंट करू शकता . याबरोबरच मनोज जरांगे पाटील विधानसभेला उमेदवार देतील का या बद्दल देखील तुमचे मत कळवा. व महा विकास आघाडी देखील कोणाला उमेदवारी देईल या बद्दल तुमचे मत नोंदवा . आणि अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता .