Cotton spray: कपाशीवर शेवटची फवारणी केव्हा आणि कोणती करावी?

Cotton spray: कपाशीवर शेवटची फवारणी केव्हा आणि कोणती करावी?

Cotton spray: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती असेल कापूस उत्पादक शेतकरी बांधव सध्या चिंतक पडलेला असून अगोदरच पावसाने दांडी मारल्यानंतर कसाबसा पावसाचे आगमन झाले आणि कपाशीवर आता कोकडा किंवा लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झालेली आहे.

मित्रांनो 85/90 दिवसापर्यंत बीटीचे जीन्स प्रतिकारक्षम असतात.पण नॉन बीटीचे जी झाडे शेतात आहेत त्यावरची अळी मरणार नाही आणि अशा नॉन बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स नसल्यामुळे त्या कापसाच्या झाडावर कापूस पीक संपेपर्यंत राहणार आहे.

Kapus pikachi favarni

Cotton spray: आपल्याला माहिती असेल की 15 ते 20 दिवसापासून कपाती कपाशी वरती रस शोषक किडी विशेषता थ्रिप्स मावा पांढरीमाशी तुकडे यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाहायला मिळत आहे यामुळे पातेगळ होते त्याचबरोबर पाने जखडतात आणि पाणी लाल पडून ते गळून जातात.विशेषतः अवैध पध्दतीने लागवड केलेले 3जी, 4जी कापूस वाण लाल पडले.15 दिवसात उपटून टाकावे लागतील अशी परिस्थिती या कापसाची झाली आहे.

विविध औषध कंपन्या शेतकऱ्यांमध्ये भीती दाखवून विविध अनावश्यक औषधी शेतकऱ्यांच्या माथेमार्गात कीटकनाशक कंपनीचे प्रतिनिधी पसरवत असलेल्या अफला बळी न पडता आपण योग्य औषध फवारणी करावी.

गुलाबी बोंडअळी नियंत्रण

Cotton spray: मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एक जून पूर्वी लागवड केलेली असेल अशा शेतकऱ्याला आता शेवटची कपाशी फवारणी करायची आहे परंतु उशिरा लागवड झालेल्या म्हणजे 10 जून नंतर लागवड झालेली किंवा कोरडो शेतकऱ्यांनी अजून दोन फवारणी करावी जेणेकरून कपाशीवर आलेल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल.

आजपासून येणारे 3/4 दिवस म्हणजे 26 ते 30 सप्टेंबर पर्यंत कापूस या पिकाला अळी नाशकांची फवारणी करून घ्यावी आणि पुन्हा 8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान 1 शेवटची फवारणी करून घ्यावी.

कोरडची व बागायती लागवड केलेल्या शेतकरी बंधूनी गुलाबी आणि हिरव्या बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे फेरोमेन ट्रॅप लावावेत.सदरील कामगंध सापळे कपाशीच्या झाडाच्या दीड ते दोन फुट उंचीवर एकरी 5-6 सापळे वेगवेगळ्या ठिकाणी लावावे.

सप्टेंबर अमावास्येला कपाशी फवारणी

Cotton spray: सप्टेंबर महिन्यातील अमावस्या नंतर 4/5 दिवसानी कपाशीवर अळी येते पण ती साध्या डोळ्यांनी दिसणार नाही.या अळी च्या नियंत्रणासाठी अंडी नाशक तर अतिसूक्ष्म अवस्थेतील अळी बोंडाच्या आत जाण्याच्या अगोदरच आपण अळी व अंडी नाशक फवारा मारून नियंत्रण मिळवू शकतो.

अमावस्येच्या नंतर चार पाच दिवसात खालील दोन पैकी कोणतीही 1 फवारणी करा.प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे.

•प्रोफेनोफॉस 50% (30 ते 40 मिली)

•डेल्टामेथ्रीन 2.8 % 20 मिली.किंवा डेल्टा मेथ्रीन 11% (10 मिली)

•सिलिका युक्त स्टिकर (6 मिली)

•निमार्क (तीव्रतेच्या प्रमाणात)

5% असेल तर 100 मिली 1000 पीपीएम असेल तर 60 मिली 1500 पीपीएम असेल तर40 मिली,10000 पीपीएम असेल तर 15 मिली,आणि 15000 पीपीएम असेल तर 10 मिली}

किंवा

•प्रोफेनोफॉस 50 % (40 मिली)

•इमामेकटींन बेंझोइत (10 ग्रॅम)

•सिलिका युक्त स्टिकर (6 मिली)

•नीमार्क(तीव्रतेच्या प्रमाणात)

last Cotton Insecticide Spray

कपाशीवर 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान खालील पैकी कोणतीही एक शेवटची फवारणी करा.

•क्लोरो पायरीफॉस 50% (40 मिली)

•इमामेकटींन बेंझोइत (10 ग्रॅम)

•सिलिकायुक्त स्टिकर (6 मिली)

•अन्ट्रोकॉल/साफ (बुरशी नाशक 30 ग्रॅम)

किंवा

•नुवान (30 मिली)

•इमामेकटींन बेंझोइत (10 ग्रॅम)

•सीलिकायुक्त स्टिकर (6मिली)

•बाविस्टीन किंवा रोको (बुरशी नाशक 30 ग्रॅम)