IAS Puja Khedkar प्रकरणात राजकीय नेत्यांची मदत
IAS Puja Khedkar आय ए एस पूजा खेडकर यांच्या प्रकरणात राजकीय नेत्यांनी देखील मदत केल्याची शंका सध्या सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील पूजा खेडकर प्रकरणांमध्ये त्यांच्या वडिलांनी देवीला अर्पण केलेल्या मुकुटावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे नाव देखील घेण्यात आलं होतं. परंतु पंकजा मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पूजा खेडकर ह्या ओबीसी प्रवर्गातून येतात परंतु यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी ओबीसी प्रवर्ग व अपंगाच्या खोट्या प्रमाणपत्रावर अपंगाच्या कोट्यावर देखील घाला घातला.

सध्या राज्यात आरक्षणाचा वाद पेटलेला आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत असताना मनोज रंगे पाटील यांनी अनेक वेळा आरोप केले आहेत की ओबीसी प्रवर्गामध्ये काही लोक खोट्या पद्धतीने आरक्षण खात आहेत. IAS Puja Khedkar पूजा खेडकर यांच्या प्रकरणावरून आता हे उघडकीस आला आहे. पूजा खेडकर यांचे कुटुंब मागास नसताना देखील ते ओबीसी प्रवर्गात आहे आणि अपंग नसताना देखील पूजा खेडकर यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र आहे. तर पूजा खेडकर यांच्याकडे अपंगत्वाचे दोन खोटे प्रमाणपत्र आहेत तेही वेगवेगळ्या नावाने. पूजा खेडकर यांनी आपले स्वतःचे व वडिलांचे नाव बदलून अनेक वेळा यूपीएससीची फसवणूक केल्याचे देखील समोर आला आहे. IAS Puja Khedkar
पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंब यांचे संबंध
हे संपूर्ण कारस्थान करण्यासाठी कोणत्यातरी राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असेल अशी चर्चा होत आहे. यापूर्वी पंकजा मुंडे आणि पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे संबंध समोर आले होते. दिलीपराव खेडकर यांनी पंकजा मुंडे यांना बारा लाखाचा चेक दिल्याचे देखील समोर आलं होतं. परंतु पंकजा मुंडे यांनी माझा आणि खेडेकर कुटुंबीयांचा कसलाही संबंध नाही असे स्पष्ट केला आहे. मी स्वीकारला नाही त्यांचा आणि माझा कसला संबंध नाही. पूजा खेडकर आणि खेडकर कुटुंबीयांच्या चुका झाल्या असतील किंवा त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे देखील वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल आहे.
पंकजा मुंडे आणि खेडकर कुटुंब यांचे संबंध
दिलीप खेडकर यांची मुलाखत
IAS Puja Khedkar यांचे वडील यांची मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलाखत न्यूज 18 लोकमत या वाहिनीने घेतलेली आहे. या मुलाखती बद्दल देखील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी विशाल बडे यांनी दिलीपराव खेडकर यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखती दरम्यान दिलीपराव खेडकर यांनी अनेक खुलासे केले आहेत. पूजा खेडकर यांनी गाडीवर दिवा व नेम प्लेट का लावली याबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केल आहे.
आतापर्यंत पूजा खेडकर यांच्यावर होत असलेले आरोप व एकंदरीत खेडकर कुटुंब यांच्यावर होत असलेले आरोप दिलीप खेडकर यांनी या मुलाखती दरम्यान फेटाळून लावले आहेत. परंतु ही मुलाखत बडे यांनी घेतलेली असल्यामुळे सध्या या मुलाखतीवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. मुलाखत देणारे खेडकर आणि घेणारे बडे असल्यावर मुलाखत किती सत्य असेल त्यावर शंका येते अशा आशयाच्या कमेंट त्या मुलाखतीवर येत आहेत.
IAS Puja Khedkar पूजा खेडकर यांना सरकारी अधिकाऱ्यांची मदत
IAS Puja Khedkar प्रकरणात सरकारी यंत्रणा मेहरबान ! पूजा खेडकर यांना दुसऱ्याच दिवशी मिळाले दिव्यांग प्रमाणपत्र. महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटलेला आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे असे लाखो पुरावे असून देखील, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र दिले जात नाही. परंतु पूजा खेडकर यांच्यासारख्या धनदांडग्या लोकांना एका दिवसात नॉन क्रिमिलियर दिले जाते. दुसरीकडे पूजा खेडेकर अपंग नसताना देखील त्यांना अपंगत्वाचे दोन खोटे प्रमाणपत्र दिले आहेत. यामुळे खेडकर कुटुंबीयांना कोणीतरी सरकारी अधिकारी मदत करत असल्याचे समोर आला आहे.
पूजा खेडकर यांचे अनेक नातेवाईक सरकारी यंत्रणेत मोठ मोठ्या पदावर आहेत. पूजा खेडकर यांचे वडील दिलीपराव खेडकर देखील मोठ्या पदावर राहिले आहेत. वडिलांचे सहकारी व आपले नातेवाईक यांची मदत घेऊन पूजा केळकर यांनी खोटे प्रमाणपत्र मिळवले असतील असा आरोप त्यांच्यावर होत आहे. पूजा खेडकर प्रकरणामुळे अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत आणले आहेत. पूजा खेडकर यांना खोटे प्रमाणपत्र देण्यासाठी व हे संपूर्ण कटकारस्थान करण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. IAS Puja Khedkar
IAS Puja Khedkar मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचारी पोलिसांची घातला होता वाद
पूजा खेडकर यांच्या आई मनोरा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत उज्जत घालताना दिसत आहेत. सदरील व्हिडिओ 2022 मधील असल्याचे बोलले जात आहे. पूजा खेडेकर यांच्या आई मनोरा खेडकर आणि अधिकाऱ्यांमध्ये होत असलेला वाद पुराव्यासाठी एका कर्मचाऱ्यांनी शूट केला होता. खेडकर कुटुंबीयांचा पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे.
IAS Puja Khedkar यांच्या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोचे काम सुरू आहे या कामासाठीचे साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्यासमोरील फुटपात वर ठेवले होते त्यावरून त्यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले मनोरमा खेडकर यांनी पोलिसांसोबत देखील वाद घातला आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पूजा खेडकर दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचे दिवसेंदिवस धक्कादायक कारणांनी बाहेर येत आहेत.

IAS Puja Khedkar दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र व्यक्ति एकच नाव आणि पत्ते अनेक
पूजा खेडकर यांनी दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र घेतल्याचे उघड झाल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. यूपीएससी परीक्षेमध्ये दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले होते. त्या प्रमाणपत्राची चौकशी सध्या सुरू आहे. यूपीएससीची फसवणूक केल्याचा समोर आला आहे. दिव्यांग नसताना त्यांनी अनेक कोटी प्रमाणपत्र मिळवली आहेत. कोणीतरी सरकारी अधिकारी त्यांना मदत करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. हा त्यांचा वास्तव्याचा पुरावा होऊ शकत नाही.
त्यांनी दोन वेगवेगळे पत्ते वापरून वाय सी एम हॉस्पिटल आणि औंध जिल्हा हॉस्पिटल येथे अपंग व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे दोन्ही हॉस्पिटलमध्ये केलेल्या अर्जामध्ये नावामध्ये देखील तफावत आहे. याबरोबरच दोन्ही अर्जावरील पत्ता देखील वेगवेगळ्या आहे. वाय सी एम हॉस्पिटल येथे त्यांनी देहूआळंदी रस्ता तळवडे तालुका हवेली पुणे हा पत्ता देऊन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. पूजा खेडकर यांनी 23 ऑगस्ट 2022 रोजी औंध रुग्णालयात अर्ज केला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना 24 ऑगस्ट 2022 रोजी वायसीएम रुग्णालयाकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले . परंतु यापूर्वीचे दिव्यांग दाखले अहमदनगर जिल्ह्यातील होते अशी माहिती अधिकार कार्यकर्ते विजयकुमार यांनी दिली आहे.
नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुप मध्ये जॉईन व्हा