Ladki Bahin Yojna लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पादन आहे अशा कुटुंबातील महिलांना राज्य सरकार प्रत्येक महिन्याला1500 रुपये देणार आहे. 2024 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेची घोषणा केली. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गोरगरीब महिलांना फायदा घेता यावा यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यामुळे या योजनेचा महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळणार आहे.
हेही वाचा लाडकी बहीण योजनेवर जरांगे पाटलांची टीका
आज पासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू
Ladki Bahin Yojna योजनेचा उद्देश
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेली आहे. महिलांना आर्थिक उन्नती साधता यावी व त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये व आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे. Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna योजनेचे वैशिष्ट्य
- महिलांना आर्थिक मदत : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल.
- Ladki Bahin Yojna 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिन या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
- ऑनलाइन प्रक्रिया : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
- व्यापक लाभार्थी : महाराष्ट्र घरातून आतापर्यंत या योजनेसाठी पाच लाखापेक्षा जास्त फॉर्म आले आहेत.
- चुका दुरुस्त करण्याची संधी : या योजनेचा फॉर्म भरताना काही चुका झाल्यास त्या सुधारता येणार आहेत.
Ladki Bahin Yojna पात्रता आणि कागदपत्रे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकष पुढीलप्रमाणे आहेत
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- उमेदवाराकडे योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र असावे
योजनेसाठी लागणारे कागदपत्र
- रहिवाशी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- कुटुंब उत्पन्नाचा पुरावा बँक पासबुक

Ladki Bahin Yojna अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन पोर्टल द्वारे स्वीकारण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी नारीशक्ती दूत या एप्लीकेशन ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या एप्लीकेशन मधून आपण आपल्या फॉर्मची स्थिती तपासू शकता व आपली प्रोफाईल अपडेट करू शकता.
एक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली लाभार्थी यादी प्रकाशित होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्यदिनी लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होईल.
योजनेचा प्रभाव व महत्त्व
राज्य सरकारने घोषित केलेली माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक उन्नती साधता येईल. याबरोबरच महिलांना आर्थिक मदत मिळेल, महिलांच्या जीवनमानात सुधारणा होईल. महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये पेमेंट जमा होणार आहे.
मुख्यमंत्री माझी बहीण योजना ही एक प्रभावी योजना आहे. या योजनेमुळे महिला स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण शकणार आहेत. या योजनेमधून मिळणारे पैसे शिक्षण किंवा कौशल्य विकास साठी वापरू शकतील. या योजनेमुळे महिलांच्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा होऊ शकते महिला स्वतःच्या आरोग्याकडे स्वतः लक्ष देऊ शकतील.
या योजनेमुळे महिलांना नवीन नवीन उद्योग करण्यासाठी मदत मिळेल. परिणामी महिला स्वावलंबी बनतील . महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यामध्ये या योजनेचा फायदा होईल.
लाभार्थ्यांची निवड :
Ladki Bahin Yojna या योजनेचा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर हा फॉर्म संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावयाचा आहे. अंगणवाडी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यामध्ये मदत करणार आहेत. व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर लाभार्थ्यांची छाननी करून निवड केली जाईल. विशेषतः ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांची निवड या योजनेसाठी होणार आहे. ही योजना एक आव्हान आहे.
Table of Contents
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे डिजिटल साक्षरता नसलेल्या महिलांना फॉर्म भरताना अडचणी येऊ शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार करून अधिक महिलांना लाभ देण्याचा विचार केला जाऊ शकतो. एप्लीकेशन फॉर्म भरण्यासाठी सुकरता यावी यासाठी विशेष कार्यशाळा राबवले जाऊ शकतात. राज्य सरकारच्या या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत तर मिळणारच आहे, याबरोबरच महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. Ladki Bahin Yojna
अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी अमच्या Whatsaap ग्रूप मध्ये जॉईन व्हा