Manoj Jarange Patil On Puja Khedkar पूजा खेडकर प्रकरणावर जरांगे पाटील काय म्हणाले बघा Big Update 20 July

Manoj Jarange Patil On Puja Khedkar

Manoj Jarange Patil मराठा आरक्षणाचे आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी देखील पूजा खेडकर प्रकरणावर वक्तव्य केले आहे. आज मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा कुणबी एकच आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. 20 जुलै 2024 आज पासून मनोज रंगे पाटील यांचे उपोषण सुरू होत आहे . माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी पूजा खेडकर प्रकरणावर वक्तव्य केले आहे. काही पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना पूजा खेडकर प्रकरणावर प्रश्न विचारला असता, जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

पूजा खेडकर प्रकरणावर जरांगे पाटील काय म्हणाले

यु पी एस सी सारख्या परीक्षांमध्ये जर घोटाळा होत असेल तर बाकी परीक्षांचे अवघडच आहे. त्यांनी केलेले घोटाळे चालतात यावर मी बोलणार नाही. जर मी बोललो तर मराठा जातीवादी ठरतो, परंतु यांनी सगळं खोटं केलं तरी चालतं. सध्या मी या विषयावर बोलणार नाही मला आरक्षणाच्या प्रकरणातून मोकळे होऊ द्या नंतर बघू. असंही त्यांना जनतेचा कौल मान्य नाही. Manoj Jarange Patil

त्यांना दादागिरी आणि मगगुरी माहित आहे. बरच भरपूर काही बोगस असू शकतं आमची मागणी बोगस नसून आमच्या मागणीला बोगस म्हणत आहेत परंतु आम्ही त्यांना मोजत नाहीत. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पूजा खेडकर प्रकरणावरून ओबीसी नेत्यांचं नाव न घेता टीका केली आहे. एखाद्या व्यक्तीचे आणि यांचं राजकारणात पटत नसेल तर हे लोक त्यांच्यावर दबाव टाकतात. मराठा आरक्षणाची मागणी जास्त असून हे लोक आम्हाला बोगस म्हणत आहेत.

यांना दुसऱ्याच आरक्षण खायला जमतं यांना फक्त स्वतःची जात मोठी व्हावी असं वाटतं. दुसऱ्यांची जात तशी आपली जात असं मानलं पाहिजे दुसऱ्यांचा उमेदवार पडला तसा आपला पडला की भावना ठेवली पाहिजे असं बोलत मनोज जरांगे पाटील यांनी एकापाठोपाठ अनेक टोले लगावले. मनोज जरांगे पाटील कोणाबद्दल बोलत आहेत हे नाव न घेताच कळत आहे.

Manoj Jarange Patil प्रकाश आंबेडकरांबद्दल काय म्हणाले

Manoj Jarange Patil माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल देखील वक्तव्य केला आहे. प्रकाश आंबेडकर एकमेव वंचितांचे नेते आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांच्याच बाजूने राहावे. प्रकाश आंबेडकर यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्याचा त्यांना वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा धनगर समाजामध्ये असलेल्या वंचितांच्या देखील बाजूने राहावे असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

Manoj Jarange Patil महाविकास आघाडी बद्दल काय म्हणाले

पाटील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील भडकले. सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून Manoj Jarange Patil आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. म्हणून पाटील सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी करत असल्यामुळे मराठ्यांचा रोष सरकारवर आहे आणि याचाच फायदा महाविकास आघाडी घेत असली तर येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा देखील सुपडा साप करावा लागेल अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाबरोबरच इतर सर्व जाती धर्मातील उमेदवार देणार किंवा ज्या उमेदवाराचा मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा असेल त्यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला आहे. वेळ पडली तर आम्ही पक्ष पाहणार नाही जो आमची भूमिका मांडेल त्यालाच आम्ही मतदान करू. 29 ऑगस्टला या विषयावर अधिकृत निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

पूजा खेडकर यांना दुसऱ्याच दिवशी मिळालं होतं अपंगाचे प्रमाणपत्र

Manoj Jarange Patil धनगर आरक्षणासंदर्भात काय बोलले

आम्ही धनगर आरक्षणाला पाठिंबा देतो, आम्ही एकाही धनगर नेत्याच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात कधीच बोललो नाहीत. आम्ही धनगरांना कधीच विरोधक मानले नाही परंतु ओबीसी नेते जाणीवपूर्वक धनगर समाजातील एखाद्या राजकारण्याला पुढे करून मराठा धनगर वाद लावीत आहेत. धनगर समाजाची आरक्षणाची मुख्य मागणी सोडून मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळ माणसे उभे करत आहे. धनगर समाज हुशार आहे धनगर समाजाला खरं काय खोटं काय कळतं. येत्या काळात धनगर आणि मराठा समाज एकत्रित दिसेल. विधानसभा निवडणुकीत धनगर, मुस्लिम, बंजारा यांना सोबत घेऊन राज्यकर्त्यांना धडा शिकवू असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा