Manoj Jarange Patil जरांगे पाटलांच्या विरोधात षडयंत्र :

Manoj Jarange Patil यांच्या विरोधात षडयंत्र : महाराष्ट्र राजकीय कार्यकर्त्यांकडून मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्यात येत आहे, काही राजकीय पक्षाला टार्गेट करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची बदनामी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील मनोज जरांगे पाटील आणि काही राजकीय पक्षांचे संबंध असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. परंतु त्याच पक्षातील नेत्यांवर सध्या जरांगे पाटील अशी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना त्यांना आलेल्या अटक वॉरंट वरून त्यांनी उद्धव ठाकरे यांचे थेट नाव घेऊन शंका व्यक्त केली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील टीका केली आहे. सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती.
विरोधी पक्ष देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाहीत. बोलत असताना शरद पवार यांच्यावर देखील जरांगे पाटील यांनी टीका केली होती. याठिकाणी नंतर जरांगे पाटील आणि शरद पवार यांचा कसलाही संबंध नसल्याचे उघड झालं होतं. काही पक्षाच्याआयटी सेल कडून जरांगे पाटील यांच्या बद्दल चुकीचा नरेटीव सेट केला जात आहे असं समाज माध्यमांवर बोलले जात आहे. जरांगे पाटील आणि महाविकास आघाडी यांच्यातील नसलेले संबंध जाणीवपूर्वक समाज माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. सध्या काही पक्षाच्या सोशल मीडिया कडून मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट अपलोड करण्यासाठी प्रति पोस्ट दोन हजार रुपये दिले जात आहेत. काय आहे अधिक माहिती या बातमीतून आपण समजून घेऊया. Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil जरांगे पाटलांच्या विरोधात षडयंत्र ,एका पोस्टचे दोन हजार रुपये :
विधानसभा निवडणुकांचा विचार करून पक्ष्यांची आयटीसेल चांगलीच ऍक्टिव्ह झाली आहे. काही पक्षाच्या आयटी सेल कडून काही खाजगी वाहिन्या व युट्युब चॅनेल, फेसबुक पेज व पोर्टलच्या माध्यमातून नरेटीव सेट करण्यासाठी पैशाची वाटप केली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्यासाठी नेते वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. काही पक्षाच्या आयटी सेल कडून एका बातमीचे दीड ते दोन हजार रुपये दिले जात आहेत, नेमकं हे कोण घडवून आणत आहे त्याची चौकशी होणे गरजेचे सध्या आहे.
नेमकं या स्क्रिप्ट देणाऱ्यांना पैसे कोण पुरवत आहे एकंदरीत कट कारस्थान काय आहे उघड झालं पाहिजे असं समाज माध्यमांवर बोलला जात आहे. युट्युब चॅनेल चालवणाऱ्यांना नेत्यांकडून व आयटी सेल कडून स्क्रिप्ट पोहोचवल्या जात असल्याचं बोललं जात आहे परंतु सत्य परिस्थिती समोर येणं देखील गरजेचे आहे. हा पैसे पुरवणारा व बातम्या पसरवणारा व्यक्ती कोण आहे? कोणाच्या सांगण्यावरून असं करत आहे? त्याला स्क्रिप्ट कोण देत आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे . ज्या स्क्रिप्ट मध्ये महाविकास आघाडी व मनोज जरांगे पाटील यांचे नसलेले संबंध जोडले जात आहेत. ही स्क्रिप्ट चैनल वाल्यांना दिली जाते, सोबतच त्यांचं मानधन दिलं जातं. Manoj Jarange Patil यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत.
नेमका काय प्रकार आहे
सध्या समाज माध्यमांवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने एका पत्रकाराला फोन करून व्हाट्सअप च्या माध्यमातून एक स्क्रिप्ट पाठवली. त्या स्क्रिप्ट मध्ये मनोज जरांगे पाटील आणि महाविकास आघाडी यांच्या बद्दल वक्तव्य केलेल आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल ही स्क्रिप्ट होती. यापूर्वी देखील अशा स्क्रिप्ट बऱ्याचशा यूट्यूब चैनल वाल्यांना दिल्या गेल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांची बदनामी केली गेली होती. हा सगळा प्रकार समाजात तेढ निर्माण करणाऱ्या खोडसाळ कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचे बोललं जात आहे.
या स्क्रिप्ट मध्ये असं बोललं गेलं आहे की Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका केली आहे ती टीका शरद पवार यांच्या सांगण्यावरून केली आहे. थोडक्यात , उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मधील वाद जनते समोर आणताना जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा हा कट आहे. तसं पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना सरकार बरोबर आघाडीला देखील धारेवर धरलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. जरांगे पाटील वारंवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होतात. त्यांनी सरकारच्या बऱ्याच नेत्यांना टार्गेट देखील केलं होतं . परंतु आपल्यावर आलेली आग दुसऱ्यांवर ढकलण्यासाठी हा प्रयत्न एखादा नेता करत असेल असेही व्यक्त केले जात आहे.

सध्या युट्युब चॅनेल वाल्यांना खोट्या स्क्रिप्ट देऊन त्यांच्याकडून खोटे व्हिडिओ बनवून घेतले जात आहेत. ज्यामध्ये जरांगे पाटील यांची बदनामी केली जात आहे. हा खोडसाळपणा कोण करत आहे हे लवकरात लवकर उघड झालं पाहिजे . सध्या सोशल मीडिया वरती ही माहिती जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणांमध्ये संभाजीनगर मधील एक व्यक्ती आहे तो कुठल्या तरी राजकीय पक्षाचा असल्याचे बोलले जात आहे. खोट्या स्क्रिप्ट देऊन खोटी माहिती यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून प्रसारित करून काही पक्षाच्या बाजूने चांगलं मत व जरांगे पाटील यांच्या विरोधात नरेटीव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न असल्याचं समाज माध्यमांवर बोलल जात आहे. एकीकडे सरकारला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हे कट कारस्थान करत असेल असंही बोललं जात आहे.

आता हा स्क्रिप्ट आणि बातम्या पेरणारा व्यक्ती नेमका सत्ताधाऱ्यांचा आहे की विरोधकांचा आहे की या सर्वाना बदनामी करणारा तिसराच आहे हे उघड होणं गरजेचं आहे. यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील शरद पवार यांच्या सांगण्यावरून बोलतात अशा खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. आता पुन्हा एकदा तोच प्रकार घडत आहे. आणि हा प्रकार पैसे देऊन घडवला जात असल्याचं उघड झालं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा मिळावा आणि दुसऱ्यांची बदनामी व्हावी या हेतूने कोणी तरी हे करत असल्याची शंका नाकारता येत नाही.
Table of Contents
पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार
महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या whatsaap ग्रुपला जॉईन