Nimgaon ma : बीड जिल्हा पोलीस दल

निमगाव मायंबा येथे बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. चकलंबा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एकसिंगे साहेब यांनी यावेळी गणेश मंडळांना आवश्यक सूचना दिल्या.
डिजे नवाजता आपण मनोभावे गणपती बाप्पाची मिरवणूक करू शकतो असे त्यांनी सांगितले. महिला सुरक्षेची दशसूत्री या पुस्तकाची वाटप करून जनजागृती केली व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कसे करावे याबद्दल भरपूर अशी माहिती दिली तसेच गणेश मंडळात पत्ते, दारू, डीजे, अशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत व चैन चोरी फसवणूक याबद्दल आपण कोणती खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.
नोकरी शोधताय मग येथे क्लिक करा
पोलीस निरीक्षक एकसिंगे साहेब यांनी निमगाव ग्रामपंचायत ला सदिच्छा भेट दिली यावेळी निमगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच सौ. मंगल महादेव घुमरे व ग्रामसेवक श्री. गोविंद खेडकर साहेब यांच्या वतीने नारायण महाराज घुंगरट यांनी एकसिंगे साहेबांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.