
Panjabrav Dakh Havaman Aandaj : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. सध्या महाराष्ट्रभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी तर महापूर आले आहेत. आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये . हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील आठवड्याचा अंदाज सांगितला आहे. आठवड्याभरात राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे व त्याचे प्रमाण किती राहणार आहे हे आपण आजच्या पोस्ट मधून जाणून घेऊया.
Panjabrav Dakh Havaman Aandaj उद्याचे हवामान अंदाज :
पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवडाभर महाराष्ट्र मध्ये पाऊस राहणार आहे. 28 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 व 29 तारखेला महाराष्ट्रातील बहुतेक भागात पाऊस राहील. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात तर बीड परभणी भागात देखील हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. याबरोबरच विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती या भागात मध्यम व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. Panjabrav Dakh Havaman Aandaj
Panjabrav Dakh Havaman Aandaj पुढील आठवड्यातील विभागानुसार हवामान अंदाज
मुंबई कोकण हवामान अंदाज : पुढील आठवड्यात म्हणजेच 28 जुलै पासून 5 ऑगस्ट पर्यंत या भागात प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकण भागामध्ये जोरदार व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीत नदीकाठच्या व समुद्र किनारा पट्टी लगतच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड रत्नागिरी कोल्हापूर या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र हवामान अंदाज : गेल्या आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पावसाने झोडपून काढला आहे. पुणे भागामध्ये अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आले आहेत. पुणे परिसरातील सर्व धरणे पाण्याने तुंब भरले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा, या भागामध्ये पुढील आठवड्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे.
या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार 28 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पुणे , सोलापूर या भागात पावसाचे प्रमाण जास्त राहील असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज : पुढील आठवड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये जोरदार व मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढचे पाच दिवस नाशिक भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये ढगफुटी सारखे प्रकार घडू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील. द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी मुसळधार पावसामुळे द्राक्ष शेतीचे नुकसान होऊ शकते.
मराठवाडा हवामान अंदाज : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात महाराष्ट्रामधील मराठवाडा भागांमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र कोकण व विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर छत्रपती संभाजी नगर काही भागात मुसळधार पाऊस होईल.
Panjabrav Dakh Havaman Aandaj विदर्भ हवामान अंदाज : पुढील आठवड्यामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 28 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत विदर्भातील पाण्याचा प्रश्न सुटेल. या आठवड्यामध्ये विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. पुढील आठवड्याचा विचार लक्षात घेता मुसळधार व जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. सर्व शेतकऱ्यांनी वेळेत आपला पिक विमा काढून घ्यावा.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी :
Panjabrav Dakh Havaman Aandaj या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाऊस होईल. पावसाचे प्रमाण हे वाढत जाईल व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रत्येक दिवशी भाग बदलून पाऊस पडेल परंतु आठवड्याभरात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली फवारणी व वखरणी वेळ भेटेल तसे लवकरात लवकर करून घ्यावी. स 28 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठे मुसळधार कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, परंतु पाऊस हा सतत सुरू राहणार आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतीचे कामे मिळेल त्या वेळेमध्ये करून घ्यावेत असं हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मत वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील 60 ते 70 टक्के धरणे भरतील असा देखील अंदाज वर्तवला आहे. या आठवड्यात प्रत्येक भागामध्ये पाऊस होणार असल्यामुळे द्राक्ष शेती व फळबाग शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. या आठवड्यामध्ये पिकाला पाणी देण्याची गरज भासणार नाही तरीदेखील ज्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे त्यांनी थोडाफार प्रमाणात पिकाला पाणी द्यावे. आठवड्याभरामध्ये जोरदार व मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे.