Talathi Viral News Vasmat :
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या डोळ्यात चक्क मिरची टाकून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आले आहे. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. व्हाट्सअप चॅटवरून वाद झाला. त्यानंतर आरोपी थेट तलाठी कार्यालयात घुसला. तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून तलाठ्याची अतिशय क्रूर पणे हत्या करण्यात आली. या घटनेने हिंगोली बरोबरच संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. तलाठी आणि आरोपी मध्ये नेमका वाद काय होता नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया.

तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरची टाकून चाकूने वार
Talathi Viral News Vasmat घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार, हे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना, प्रताप कराळे नावाचा व्यक्ती कार्यालयात घुसला. व्हाट्सअप ग्रुप वरील मेसेज वरून त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी तलाठी पवार यांनी त्याला उत्तर दिलं. मी काय चुकीचं करतोय मी जे काही व्हाट्सअप ग्रुपला टाकलं ते योग्यच आहे. तलाठी पवार यांच उत्तर आल्याबरोबर प्रताप कराळे याने आपल्या खिशातील मिरचीची पावडर काढली आणि तलाठी पवार यांच्या डोळ्यात फेकली. त्यानंतर तलाठी पवार यांनी आरडाओरड केली. Talathi Viral News Vasmat
कार्यालयातील गोंधळ आणि आरडाओरड ऐकून कार्यालयातील इतर कर्मचारी धावून आले, परंतु कर्मचारी पवार यांच्यापर्यंत पोहोचूपर्यंत प्रताप कराळे याने धारदार चाकूने पवार यांच्यावर वार केले. डोळ्यात मिरची गेल्याने पवार यांना काहीच दिसत नव्हतं त्यामुळे त्यांना विरोध करता आला नाही.
नवीन व्यवसायिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे पंधरा लाखापर्यंत लोन
Talathi Viral News Vasmat तलाठी कार्यालयात उपस्थित असलेले शिकवू तलाठी बालाजी डवरे यांनी तात्काळ प्रताप कराळे यांना धरून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला, आणि प्रतापला कार्यालयाच्या बाहेर नेले. तरीही कराळे आरडा ओरड करत होता यानंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.
Table of Contents
रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू
जखमी अवस्थेत पडलेल्या तलाठी पवार यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्याबरोबर परभणीचे जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधवव, महसूल विभागाचे सर्व अधिकारी यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पवार यांची अवस्था बघून सर्व अधिकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

Talathi Viral News Vasmat जमिनीच्या वादातून हत्या झाली असल्याची शक्यता
घटनेनंतर सर्व अधिकाऱ्यांसमोर पवार यांच्या कुटुंबाने फोडून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे संभाजीनगर येथून निघाले असून संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना ते भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रताप कराळे याला अटक केली आहे. आरोपी कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन दुसऱ्याच्या नावावर का करून दिली असा जाब विचारत होता. यापूर्वी देखील आरोपी आणि तलाठी यांच्यामध्ये अनेक वेळा बाजाबाची झाल्याचे देखील प्राथमिक माहिती मध्ये समजत आहे. अनेक वेळा तलाठी यांनी आरोपीची समजूत देखील काढली होती. कोणाची जमीन दुसऱ्याच्या नावावर करून देणे एवढं सोपं नसतं आणि हे माझ्या हातात नाही असं आरोपीला वारंवार तलाठी यांनी सांगितलं होतं.
तलाठी पवार यांनी वारंवार समजूत काढून देखील आरोपीने ऐकलं नाही आणि शेवटी नको तेच झालं. आज आरोपी कराळे यांनी थेट तलाठी पवार यांचा निर्दयीपणे खून केलाय आणि या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला . दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. या घटनेवर महाराष्ट्रभरातून आता पडसाद उमटत आहेत. पवार यांच्या हस्ते बद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे परंतु आरोपी देखील एवढी टोकाची भूमिका कशी काय घेऊ शकतो यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तलाठी पवार यांनी त्यांच्या जमिनी संदर्भाच्या वादात खरंच हस्तक्षेप केला होता का याबद्दल देखील आता उलट सुलट चर्चेला उधान आलं आहे. काहीही असो परंतु हा जमिनीचा वाद तलाठी पवार यांच्या जीवावर घेतला आहे.
सरकारी योजना जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा